Egg : अंडे शाकाहारी की मांसाहारी; शास्त्र काय सांगतं?

Anirudha Sankpal

अंड शाकाहारी आहे की मांसाहारी, यावर लोकांमध्ये आणि शास्त्रज्ञांमध्ये नेहमीच चर्चा होत असते.

बाजारात मिळणारी बहुतेक अंडी ही 'अनफर्टिलाइज्ड' असतात. याचा अर्थ, कोंबडी आणि कोंबडा यांच्यातील 'मिलन' न होता कोंबडीने ही अंडी दिली आहेत.

अशा अंड्यांमध्ये जीव (भ्रूण) किंवा पिल्लू (चूजा) तयार होण्याची क्षमता नसते. यातून कोंबडीचे पिल्लू कधीही बाहेर येत नाही.

अंड्याच्या पांढऱ्या भागात फक्त प्रथिने (Protein) असतात, तर पिवळ्या बलकात प्रथिने, फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल असते. यात 'मांसाचा' (Meat) अंश नसतो.

ज्या गोष्टीतून जीव जन्माला येऊ शकत नाही आणि ज्यात मांस नाही, त्याला तांत्रिकदृष्ट्या शाकाहारी (Vegetarian) मानले जाते.

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जसे प्राण्यांपासून मिळतात, तसेच या अंड्याला 'ओवो-वेजिटेरियन' (Ovo-Vegetarian) या गटात ठेवले जाते.

दुसरीकडं ज्याप्रमाणे मांस प्राण्यापासून मिळते, तसेच अंडे हे देखील एका सजीवाकडून (कोंबडीकडून) येते. या कारणामुळे अनेक लोक याला मांसाहारी (Non-Vegetarian) मानतात.

काही तर्कांनुसार, ज्या पदार्थाच्या पेशीला 'सेल मेम्ब्रेन' असते तो मांसाहारी असतो आणि ज्याला 'सेल वॉल' असते तो शाकाहारी असतो. अंड्याला सेल मेम्ब्रेन असते, त्यामुळे ते मांसाहारी आहे, असे मानले जाते.

बहुतांश लोक जो आहार घेतात, त्यामध्ये अनफर्टिलाइज्ड अंडी समाविष्ट असतात आणि वैज्ञानिकदृष्ट्या ती शाकाहारी मानली जातात.

परंतु, पारंपरिक विचारांचे लोक आणि जे पूर्णपणे प्राणिजन्य उत्पादने टाळतात, ते अंड्याला मांसाहारीच मानतात. तुमच्यासाठी कोणता दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, यावर हे अवलंबून आहे.

येथे क्लिक करा