पुढारी वृत्तसेवा
अंड्यात प्रोटीन, बायोटीन आणि फॅटी अॅसिड्स असतात, जे केस मजबूत व चमकदार करतात.
एक अंडं आणि अर्धा कप दही मिसळा. हा मास्क केसांना मॉइश्चर देतो.
एक अंडं आणि 2 चमचे कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावा, केसगळती कमी होते.
अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस टाळू स्वच्छ ठेवतो.
अंडं आणि 1 चमचा एरंडेल तेल केसांच्या वाढीस मदत करते.
केसांवर 20–30 मिनिटे मास्क ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा.
गरम पाणी वापरू नका, नाहीतर अंड्याचा वास राहू शकतो.
आठवड्यात 1 वेळा हा मास्क लावणे पुरेसे आहे.
अंड्याची अॅलर्जी असल्यास वापर टाळावा.