Alcohol Fact | दारू, बिअर कॉकटेल घेतल्यास शरीरात नेमकं काय घडतं?

पुढारी वृत्तसेवा

दारू आणि बिअर एकत्र करून कॉकटेल घेतल्यास दोन्ही पेयांतील अल्कोहोलचे प्रमाण, पिण्याचा वेग आणि व्यक्तीची सहनशक्ती यावर परिणाम अवलंबून असतो

दारू आणि बिअर एकत्र घेतल्यास अल्कोहोलचे एकूण प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे रक्तातील अल्कोहोल पातळी लवकर वाढून नशा पटकन चढते

जास्त नशा आणि नियंत्रण कमी होऊन मेंदूवरील परिणाम तीव्र होतो, निर्णयक्षमता कमी होते, बोलणे, चालणे आणि शरीराचा समतोल बिघडतो

बिअरमध्ये कार्बोनेशन (गॅस) असतो, तर हार्ड लिकर तीव्र असते. दोन्ही एकत्र घेतल्यास अॅसिडिटी वाढते, पोट फुगणे, जळजळ, मळमळ आणि उलट्या होण्याची शक्यता वाढते

“हॅंगओव्हर” अधिक तीव्र होऊन डोकेदुखी, शरीरात थकवा, तोंड कोरडे पडणे (डिहायड्रेशन), चिडचिड आणि लक्ष केंद्रीत न होणे असा त्रास सुरू होतो.

यकृत अल्कोहोल कमी करण्याचे काम करते. जास्त आणि मिश्रित अल्कोहोल घेतल्यास यकृतावर जास्त ताण येतो, फॅटी लिव्हर, लिव्हर डॅमेजचा धोका वाढतो

दारू आणि बिअर दोन्ही मूत्रवर्धक असतात, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डोकेदुखी, अशक्तपणा वाढतो

बिअर आधी आणि दारू नंतर घेतल्यास त्रास कमी होतो, असा एक समज आहे. मात्र, शरीरात एकूण किती अल्कोहोल जाते, यावर परिणाम अवलंबून असतो

दारू आणि बिअर एकत्र घेतल्यास नशा लवकर चढते, पोट व यकृतावर ताण येतो आणि हॅंगओव्हर तीव्र होतो. त्यामुळे असे कॉकटेल आरोग्याच्या दृष्टीने टाळावे

येथे क्लिक करा