Watermelon | उन्हाळ्यात गोड कलिंगड कसे ओळखावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात कलिंगड खाणे हा एका वेगळाच अनुभव असतो. रखरखत्या उन्हात कलिंगडच्या फोडी खाल्ल्याने शरीराला गारवा मिळतो

उन्हाळ्यात रसाळ आणि गोड कलिंगड मिळणे ही एक मेजवानीच असते, पण अनेकदा बाहेरून छान दिसणारे कलिंगड आतून चवहीन निघते

त्यामुळे लालेलाल आणि गोड कलिंगड खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघणे गरजेचे असते, याबाबत खालील काही टिप्स दिलेल्या आहेत

कलिंगडावर कधीकधी तपकिरी रंगाच्या कोरड्या जाळ्यांसारख्या खुणा दिसतात. याला 'वेबिंग' म्हणतात. फळ तयार होताना मधमाश्यांनी त्या फुलाचे परागीकरण केल्याने कलिंगड गोड असते

कलिंगडाच्या सालीवरील रेषा एकमेकांच्या जवळ असतील, तर कलिंगड गोड असते, तर जास्त अंतरावर रेषा असल्यास बेचव असू शकते

कलिंगडावर मोठा पिवळा डाग असल्यास कलिंगड गोड असण्याची शक्यता असते. पांढरट डाग असल्यास गोड चव कमी असू शकते

गोल आकाराचे कलिंगड विशेषता अधिक गोड आणि चविष्ट असते, तर लांबट किंवा अंडाकृती कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते

दोन सारख्या आकाराची कलिंगडे हातात घ्या, जे कलिंगड आकाराच्या तुलनेत जास्त जड वाटते, ते निवडा. जड कलिंगडामध्ये रसाचे प्रमाण जास्त असते

कलिंगडावर बोटांनी टिचकी मारून किंवा थोपटून पहा. आवाज ठोकळ किंवा खोल येत असेल, तर त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर आहे आणि ते नीट पिकले आहे

येथे क्लिक करा