Relationship Tips : पार्टनर तुमचं ऐकत नाही? नातं मजबूत करण्यासाठी वापरा ‘या’ खास टिप्स

Asit Banage

योग्य वेळ निवडा

पार्टनर थकलेला किंवा रागात असताना गंभीर चर्चा टाळा.

बोलण्यापूर्वी परवानगी घ्या

“आपण आता बोलू शकतो का?” असे विचारल्याने संवाद सकारात्मक होतो.

दोषारोप टाळा

“तू कधीच ऐकत नाहीस” असे बोलण्याऐवजी भावना शांतपणे व्यक्त करा.

सकारात्मक भाषा वापरा

“मला दुर्लक्षित वाटतं” अशा वाक्यांमुळे समोरचा व्यक्ती अधिक समजून घेतो.

समोरच्याचेही ऐका

संवाद हा द्वि-मार्गी असतो; पार्टनरचा दृष्टिकोन समजून घेणे महत्त्वाचे आहे.

शांत आणि संयमी रहा

आवाज चढवणे किंवा टोमणे मारणे नात्यात दुरावा निर्माण करू शकते.

मनमोकळा संवाद ठेवा

भावना दाबून न ठेवता योग्य पद्धतीने व्यक्त करा.

गरज असल्यास समुपदेशकाची मदत घ्या

परिस्थिती सुधारत नसेल तर रिलेशनशिप काउन्सेलरचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...