Better Sleep Habits | शांत अन् गाढ झोप येत नाही? आजपासूनच अंमलात आणा 'या' 9 सोप्या आणि प्रभावी सवयी

पुढारी वृत्तसेवा

ठराविक वेळी झोपा

दररोज एकाच वेळेला झोपल्याने शरीराचे जैविक घड्याळ संतुलित राहते आणि झोप चांगली लागते.

Golden hours for sleep | Pudhari

झोपण्यापूर्वी मोबाईल टाळा

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीमधून निघणारा निळा प्रकाश झोपेवर परिणाम करू शकतो.

Healthy sleep routine | Canva

कॅफिनचे सेवन कमी करा

संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सचे सेवन टाळल्यास झोप सुधारू शकते.

Coffee | Pudhari

हलका रात्रीचा आहार घ्या

खूप जड किंवा मसालेदार जेवणामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

Yo-Yo Dieting

झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा

ध्यान, प्राणायाम किंवा पुस्तक वाचण्यासारख्या सवयी मन शांत करण्यास मदत करतात.

Sleeping On Floor Benefits

बेडरूमचे वातावरण आरामदायी ठेवा

अंधुक प्रकाश, शांत वातावरण आणि योग्य तापमान चांगल्या झोपेसाठी उपयुक्त ठरते.

Sleeping On Floor Benefits

दिवसभर सक्रिय राहा

नियमित व्यायाम केल्याने शरीराचा थकवा कमी होतो आणि रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते.

Walking Benefits | file photo

पुरेशी झोप का महत्त्वाची?

चांगली झोप शरीराच्या दुरुस्तीसाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत आवश्यक असते.

Sleeping On Floor Benefits

झोपेच्या सवयी बदला

लहान-लहान बदल केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते आणि दिवसभर ताजेतवाने वाटू शकते.

Golden hours for sleep | Pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>