Eating with hands|चमचा ठेवा बाजूला! हाताने जेवल्याने नक्की काय घडतं? पंचबोटांची महत्वाची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

हाताने जेवणे केवळ जुनी परंपरा नसून, आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये मोठे फायदे आहेत.

हाताने जेवल्यामुळे आपली पाचन क्रिया जलद गतीने सक्रिय होते, शरीराला ऊर्जा मिळते.

हाताच्या पाचही बोटांमध्ये पाच वेगवेगळ्या ऊर्जा म्हणजेच 'पंचमहाभूतांचा' समावेश असतो.

जेवताना जेव्हा पाचही बोटं एकत्र येतात, तेव्हा विशेष योग 'मुद्रा' तयार होते.

ही योगमुद्रा शरीराचे तत्व संतुलित करून तंत्रिका तंत्र, मेंदूला अन्नपचनाचा संदेश पाठवते.

हाताने जेवल्याने अन्नाचा स्पर्श, तापमान जाणवल्यामुळे शरीराची इंद्रिये सक्रिय होतात.

यामुळे मेंदू अन्नाशी थेट जोडला जातो, ज्यामुळे भुकेनुसार जेवण करणे शक्य होते.

अंगठा (अग्नी तत्व): हाताचा अंगठा मेटाबॉलिज्म सक्रिय व नियंत्रित ठेवतो.

तर्जनी (वायू तत्व): हे बोट शरीरातील हवेची गती, रक्तप्रवाह कार्याशी थेट जोडलेले असते.

मध्यमा (आकाश तत्व):हे बोट आपल्या शरीराला अचूक समतोल व विस्ताराची ऊर्जा प्रदान करते.

अनामिका (पृथ्वी तत्व): हे बोट आपल्या संपूर्ण शरीराला स्थिरता, मजबूती व उत्तम पोषण देते.

कनिष्ठिका (जल तत्व): करंगळी हे बोट शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते व पचन रस वाढवण्यास मदत करते.

Reasons not to tie Black Thread | काळा धागा पायात कुणी बांधू नये? काय आहेत समज-गैरसमज?