Asit Banage
हिवाळ्यामध्ये आवळ्याला रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे आणि शरीराला आतून मजबूत करणारे 'सुपरफूड' मानले जाते.
आवळा हा व्हिटॅमिन ‘C’चा उत्तम स्रोत आहे.
आवळ्याचे अतिसेवन केल्याने काही समस्या उद्भवू शकतात.अति प्रमाणात आवळा खाल्ल्यास पोटात आम्लता वाढू शकते.
जास्त आवळ्यामुळे छातीत जळजळ व आंबट ढेकर येऊ शकतात.
गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या तक्रारी वाढू शकतात.
आवळ्यातील जास्त फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
काही लोकांमध्ये आवळ्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
आवळ्याचे सेवन नेहमी मर्यादेत आणि संतुलित आहारासोबत करणे आवश्यक आहे.