पुढारी वृत्तसेवा
अनेकदा आपल्या मनात शंका असते की पेट्रोल पंपावर खरंच योग्य प्रमाणात पेट्रोल मिळते का? आज जाणून घेऊया पेट्रोल भरण्याची योग्य पद्धत!
काही लोक 110, 210 किंवा 310 चे पेट्रोल भरतात, त्यांना वाटते की असे केल्याने फसवणूक होणार नाही. पण पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने सांगितले आहे की याने काही फरक पडत नाही.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानेच योग्य पेट्रोल-डिझेल भरण्याचे दोन महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत. ते जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल!
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पेट्रोल भरताना मशीनवर डेन्सिटी नक्की तपासा. ही पेट्रोलची शुद्धता दर्शवते.
पेट्रोलची डेन्सिटी 720 ते 775 च्या दरम्यान असायला हवी. जर डेन्सिटी या रेंजमध्ये नसेल, तर ते पेट्रोल भेसळयुक्त असू शकते!
डिझेलसाठी, ही डेन्सिटी 820 ते 860 पर्यंत असते. डेन्सिटी योग्य असेल तरच इंधन भरावे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पेट्रोल भरताना '0' आकडा तर प्रत्येकजण पाहतो. पण त्यानंतरचा अंक खूप महत्त्वाचा आहे.
'0' नंतरचा पहिला अंक 5 पासून सुरू व्हायला हवा, उदा. 0.00 नंतर 0.05, 0.06 किंवा 0.02, 0.03 असा अंक यावा.
जर '0' वरून मीटर थेट 10, 12 किंवा 15 वर गेला, तर मशीनमध्ये छेडछाड केली गेली असण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही सावध व्हा!
या दोन सोप्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक टाळू शकता आणि आपल्या गाडीत शुद्ध इंधन भरू शकता.