Samosa Jalebi Health Risks | सतत समोसा, जिलेबी खातायं? शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम

अविनाश सुतार

सतत समोसा-जलेबी खाल्ली तर वजन वाढून कोलेस्टेरॉल वाढते. परिणामी हृदयाचे आजार वाढू शकतात

समोसा आणि जलेबी वनस्पती तेलात बनवले, तर ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक वाढते

ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटमुळे एलडीएल (वाईट) कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात

एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका वाढतो

सॅच्युरेटेड फॅट देखील दररोजच्या कॅलरीजच्या सेवनाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. २००० कॅलरीजमधून २०० पेक्षा कमी कॅलरीज सॅच्युरेटेड फॅटमधून आल्या पाहिजेत

समोसामध्ये असलेले फॅट कोलेस्टेरॉल वाढवतात आणि ब्लॉकेज, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात

जास्त चरबी शरीराला इन्सुलिन प्रतिरोधक बनवू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडून मधुमेह होऊ शकतो

समोसातील ट्रान्स फॅट्स स्मरणशक्ती कमकुवत करू शकतात. ज्यामुळे मूड स्विंग आणि स्मरणशक्तीच्या समस्या उद्भवतात

समोसा, जिलेबीतील जास्त चरबीयुक्त फॅटमुळे पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे कमी ऊर्जा आणि झोप येते

येथे क्लिक करा