पालेभाज्यापालक, कोबी आदीसह पालेभाज्या पाण्यामुळे दूषित होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे हानिकारक जंतू शरीरात जाऊ शकतात.तळलेले स्ट्रीट फूडपावसाळ्यात रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठेवलेले तळलेले पदार्थ टाळा. बटाटे वडा, भजी, समोसा आदींमुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.सीफूडपावसाळ्यात मासे आणि कोळंबी टाळा, कारण प्रजनन हंगामात त्यांच्यात विषारी पदार्थ आणि परजीवी असण्याची शक्यता जास्त असते . फळेरस्त्यावरील विक्रेत्यांकडून आधीच कापलेली फळे माश्या आणि ओलाव्याच्या संपर्कात येतात. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.कार्बोनेटेड शीतपेये ड्रिंक्स शरीरातील खनिजांचे प्रमाण कमी करतात आणि पचनक्रियेत अडथळा निर्माण करतात.दही आणि ताकआंबलेल्या दुग्धजन्य पदार्थांमुळे पावसाळ्यात पोटफुगी आणि अपचन होऊ शकते .बेकरी पदार्थपावसाळ्यात बेकरी पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवत केल्यास उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी यासारखे आजार होऊ शकतात .मटण, चिकन पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पचनास जड असलेले मटण, चिकन खाणे टाळा.शिळे अन्नपावसाळ्यात शिळे अन्न खाल्यास अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते .येथे क्लिक करा.