One Cardamom Daily: रोज १ वेलदोडा खाल्याने तुमच्या शरीरात का बदल होतात?

Anirudha Sankpal

माऊथ फ्रेशनर

भारतीय स्वयंपाकघरात आणि माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाणारा वेलदोडा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

वेलदोडा चघळण्याचे फायदे

न्यूट्रिशनिस्टच्या मते, दररोज फक्त एक वेलदोडा चघळल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

दात किडण्यापासून संरक्षण

यात असलेल्या प्रतिजैविक (ॲंटीबॅक्टेरियल) गुणधर्मांमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दात किडण्यापासून संरक्षण मिळते.

वेलदोडा अन् पित्त

वेलदोड्यामुळे लिव्हरमधून पित्ताचा स्राव वाढतो, ज्यामुळे जड अन्न पचवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

मूत्रवर्धक वेलदोडा

वेलदोडा एक नैसर्गिक डाययूरेटिक (मूत्रवर्धक) म्हणून काम करते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि पाणी बाहेर काढण्यास मदत होते.

अपचन दूर करते

वेलदोड्यामध्ये असणारे सिनेओल आणि टर्पिनिल एसीटेट हे घटक पचनसंस्थेची स्नायू Relax करून पोटात फटकलेली गॅस आणि अपचन दूर करतात.

औषध न मानण्याचा सल्ला

आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी, दीर्घकाळ त्रास असल्यास वेलचीला औषध न मानता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करा