पुढारी वृत्तसेवा
'अंजीर' हे शरीराला ऊर्जा देणारे आणि अनेक आजारांवर गुणकारी ठरणारे अत्यंत पौष्टिक फळ आहे.
सुक्या अंजिरात लोह (Iron), व्हिटॅमिन 'A', सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरिक ॲसिड यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक आढळतात.
शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा असल्यास रोज दुधात २-४ अंजिरे उकळून खाल्ल्यास शरीरात नवा जोम आणि ताकद येते.
सुके अंजीर पचायला जड असते. त्यामुळे ते खाण्यापूर्वी १ ते २ तास पाण्यात भिजत ठेवावे किंवा दुधात उकळून नीट चावून खावे.
रोज योग्य प्रमाणात अंजिराचे सेवन केल्याने पोट साफ होते आणि जुनाट मलावरोधाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.
१ सुके अंजीर आणि ५-१० बदाम दुधात उकळून प्यायल्याने रक्तशुद्धी होते आणि शरीर बलवान बनते.
रात्री दुधात अंजीर उकळून खाल्ल्यास कोरडा खोकला दूर होतो, कफाचे प्रमाण कमी होते आणि श्वासाच्या त्रासात आराम मिळतो.
अंजीर क्षयरोग्यांसाठी पथ्यकारक आहे. तसेच सुक्या अंजिराचा लेप घशातील सूज कमी करतो आणि त्याच्या मुळांच्या सालीचा वापर त्वचाविकारांवरील औषधात होतो.
अंजीर पचायला जड असल्याने दिवसभरात त्याचे अतिसेवन टाळावे. यामुळे पोटदुखी, मुरडा आणि यकृताला त्रास होऊ शकतो!