Asit Banage
जर तुम्ही शाकाहारी असाल आणि प्रथिनांच्या कमतरतेवर मात करू इच्छित असाल तर तुम्ही आहारात पिस्ताचा समावेश करू शकता, असे तज्ज्ञ सांगतात.
पिस्ता हा प्रथिनांचा चांगला स्रोत असून मूठभर (सुमारे 28 ग्रॅम) पिस्तामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात.
शाकाहारी लोकांसाठी पिस्ता प्रथिनांची कमतरता भरून काढण्यास मदत करतो.
पिस्तामध्ये आवश्यक अमिनो ॲसिड असल्याने स्नायूंच्या डागडुजीसाठी उपयुक्त ठरतो.
रात्री पिस्ता खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.
पिस्ता मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत असल्यामुळे मन शांत ठेवण्यास मदत होते.
मॅग्नेशियम हृदयाचा ठोका संतुलित ठेवण्यासही सहाय्यक ठरते.
पिस्तामधील फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते.