Bannur goat |तुम्हाला माहिती आहे का? ‘या’ बकऱ्याचे मटण असते सर्वात चवीचे, किंमत आहे 1200 रुपये प्रतिकिलो

Namdev Gharal

कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यातील बन्नूर तालुक्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि रसाळ व चवदार मटणासाठी प्रसिद्ध मेंढी आहे जिला ‘बन्नूर मेंढी’ (बकरी) म्हणतात

या मेंढीचे मटण भारतात सर्वात प्रिमियम मानले जाते. कर्नाटक सरकारने या ठिकाणच्या मेंढ्याच्या मटणला GI टॅग दिला आहे. हिला ‘मांड्या मेंढी’ म्हणूनही ओळखले जाते

साधारण मेंढीं किंवा बकऱ्याचे मटण 600 ते 700 किलो रुपयापर्यंत असते पण बंगळुरूमध्ये खऱ्या बन्नूर मटणाचा दर 1200 रुपये प्रति किलो पर्यंत असतो

या मेंढीच्या मांसात चरबीचे प्रमाण संतुलित असल्याने ते अत्यंत चविष्ट आणि मऊ असते. त्‍यामुळे याची चव वाढते तसेच किंमतही जास्त आहे

'बन्नूर मटण' हे दक्षिण भारतात विशेषतः बेंगळुरू आणि म्हैसूरमध्ये मोठ्या किमतीत विकले जाते. हॉटेल व्यवसायात याला मोठी मागणी असते.

ही जात कर्नाटकच्या कावेरी नदीच्या खोऱ्यातील मांड्या जिल्ह्यात उगम पावली आहे. बन्नूर तालूक्यात हिची पैदास जास्त आहे.

रंग: यांचा रंग प्रामुख्याने पांढरा असतो, परंतु चेहरा आणि मानेचा भाग गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असतो.

या मेंढ्या आकाराने लहान पण दिसायला भरभक्कम आणि मांसल असतात. या मेंढ्यांचे कान लांब, जाड आणि खाली झुकलेले असतात.

या जातीच्या मेंढ्या आणि मेंढे दोन्हीही प्रामुख्याने शिंगरहित असतात. यांचे नाक थोडेसे वक्राकार पद्धतीचे असते.