Benefit Of Pear : नाशपाती दररोज खावा, आरोग्याच्या 'या' समस्या दूर ठेवा

अविनाश सुतार

नाशपाती हे चविष्ट हंगामी फळ असून आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मान्सून आणि शरद ऋतूमध्ये हे फळ उपलब्ध असते

नाशपाती फळ जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थांनी (फायबर) समृद्ध असते

दररोज केवळ एक नाशपाती खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो

पाचन तंत्र सुधारते

नाशपातीमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे फायबर मुबलक असतात. हे कब्ज, वायू आणि पोट फुगणे कमी करते तसेच आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते

हृदयाचे आरोग्य सुधारते

नाशपातीमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्व C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो, तर अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करते

नाशपातीमुळे धमन्या स्वच्छ ठेवते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते. दररोज एक नाशपाती खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

नाशपातीमध्ये जीवनसत्त्व C आणि K मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. मान्सूनच्या काळात व्हायरल संसर्गापासून संरक्षण देते

वजन नियंत्रणात मदत करते

नाशपातीतील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, हे मेटाबॉलिझम सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवते

येथे क्लिक करा