अविनाश सुतार
जमिनीवरील मेंढीपासून ते समुद्रातील मोहक मांता रेपर्यंतच्या शांत स्वभावातून निसर्गाचा पैलू प्रकट होतो
मेंढी (Sheep)
मेंढ्या नेहमी गटाने राहतात कारण गटाने राहिल्याने त्यांना शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळते, केवळ धोका किंवा प्रजननकाळातच आक्रमक होतात
ससा (Rabbit)
ससे हे शिकारींच्या निशाण्यावर असणारे प्राणी आहेत, त्यामुळे त्यांच्या शरीररचनेत वेग हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मजबूत मागील पायांमुळे ते जलद आणि चपळ उड्या मारू शकतात
फुलपाखरू (Butterfly)
फुलपाखरू हे अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा संपूर्ण रूपांतर प्रक्रियेतून विकसित होते. अळ्या पाने खातात, तर प्रौढ फुलपाखरे मधावर जगतात
मॅनेटी (Manatee)
मॅनेटी हे हळू हालचाल करणारे जलचर सस्तन प्राणी असून त्यांना "समुद्री गायी" असेही म्हणतात. ते समुद्रातील गवत आणि जलवनस्पती खातात. त्यांच्याकडे नखे, दात नसल्याने ते पूर्णपणे निरुपद्रवी असतात.
रेड पांडा (Red Panda)
रेड पांडा हे लाजाळू आणि एकटे राहणारे प्राणी आहेत, जे बहुतेक वेळा झाडांवरच राहतात. ते संध्याकाळी आणि रात्री सक्रिय असतात. ते फळे, अंडी, कीटक आणि लहान प्राणी देखील खातात
मांता रे (Manta Ray)
मांता रे या सर्वात मोठ्या किरणप्रजातींपैकी एक आहेत. त्या समुद्रातील लहान मासे आणि प्लँक्टन खातात. त्या मनुष्यांसाठी धोकादायक नसतात