Papaya Health Tips : पपई खा, आरोग्य जपा; जाणून घ्या आश्चर्यकारक आरोग्य फायदे!
पुढारी वृत्तसेवा
पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सामान्य संसर्गांशी लढण्यास मदत होते.
पपईमध्ये नैसर्गिकरीत्या पपेन नावाचे पाचक एंझाइम आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पपईमध्ये असणार्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
पपईमध्ये असलेले बीटा-कॅरोटीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दृष्टीदोषांच्या समस्यांना प्रतिबंध होऊ शकतो.
पपईत दाह-विरोधी (अँटी-इंफ्लेमेटरी) गुणधर्म असल्याने संधिवात (आर्थरायटिस) सारख्या आजारांमध्ये आराम मिळण्यास मदत होते.
पपईमधील फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते,यामुळे हृदय आणि रक्तभिसरण प्रणालीचे आरोग्य चांगले राहते.
पपईमध्ये कॅलरी खूप कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
पईत ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स असतात. याचा लाभ मेंदूच्या कार्यासह मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी होतो.
येथे क्लिक करा.