पुढारी वृत्तसेवा
रसाळ फळांचा विचार केला, तर त्यात जांभूळ या छोट्याशा फळाचाही समावेश आहे. वजन घटवण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत हे छोटेसे फळ मदत करते
चवीला गोड आणि आंबट, गडद जांभळ्या रंगाच्या जांभूळमध्ये भरपूर पोषक घटक असतात. दिवसातून मूठभर जांभूळ खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात
जांभूळ हे लो कॅलरी फूड आहे आणि त्यात जास्त प्रमाणात यटोकेमिकल्स असतात. तसेच फ्रक्टोज आणि ग्लुकोज कमी प्रमाणात आढळतात
जांभूळचे नियमित सेवन केल्याने पचन आणि चयापचय नियंत्रित होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
जांभूळ खाल्ल्याने कार्बोहायड्रेटस्चे उर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते
यूएसडीए नुसार, 100 ग्रॅम जांभूळ 79 मिलिग्राम पोटॅशियम प्रदान करते, जे रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका टाळतो
अँटी-बॅक्टेरियल जांभूळचे सेवन केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो, कॅव्हिटीपासून आराम मिळून श्वासाची दुर्गंधीही दूर होऊ शकते
जांभूळ खाल्ल्याने व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम व्यतिरिक्त पॉलिफेनॉल मिळतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो
मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात जांभूळचे सेवन करावे. यामुळे वारंवार लघवीला जाणे आणि तहान लागणे ही समस्या दूर होते