Anjeer Benefits for Fertility | प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी 'हे' फळ खा; मिळतील अद्भूत फायदे

अविनाश सुतार

अंजीर सुपरफ्रूट

अंजीर हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचे भांडार आहे. अंजीर रोज खाल्ल्याने पचन, हृदय, हाडे व त्वचेचे आरोग्य सुधारते. हे खरेच एक सुपरफ्रूट आहे

आहारातील तंतुमय पदार्थांचा समृद्ध स्रोत

अंजीरमुळे पचनसंस्था सुरळीत राहते, बद्धकोष्ठता टळते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासही मदत होते

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

अंजीरातील विद्रव्य फायबर (पेक्टिन), अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. यामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका कमी होतो

वजन नियंत्रणात मदत

अंजीरातील जास्त फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते. विशेषतः सुकवलेल्या अंजीराचा नाश्त्यात समावेश केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यात मदत होते

हाडे मजबूत बनवते

अंजीरमधील कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हाडांची घनता टिकून राहते, ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो आणि हाडांची ताकद वाढते

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते

अंजीर इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतो. त्यामुळे मधुमेहींसाठी हे चांगले स्नॅक ठरू शकते, मात्र मर्यादेतच सेवन करावे

प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त

अंजीर नैसर्गिक कामोत्तेजक मानले जाते. झिंक, मॅग्नेशियम आणि लोह हार्मोन्सचे नियमन करतात आणि स्त्री-पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेस मदत करतात

त्वचेचे आरोग्य सुधारते

अंजीर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व A, E, C तसेच लोह, झिंक यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. यामुळे त्वचेतील पेशींचे नुकसान व अकाली वृद्धत्व टाळले जाते. नियमित सेवनामुळे मुरुम आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अंजीरातील अँटिऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे शरीराला संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करतात. त्यात जंतुनाशक व दाहक-विरोधी गुणधर्म असून सर्दी, फ्लू आणि श्वसनासंबंधी आजारांपासून संरक्षण मिळते

येथे क्लिक करा