अंडी उकडताना त्याचे कवच सहज निघण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स नक्की फॉलो करा...

पुढारी वृत्तसेवा

अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ टाकल्यास कवच सहज निघण्यास मदत होते.

पाणी पूर्णपणे उकळल्यानंतरच त्यात हळूवारपणे अंडी सोडावीत.

उकडलेल्या अंड्यांना गरम पाण्यातून काढून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाकावे.

अंड्यांमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्याने देखील कवच पटकन वेगळे होते.

ताजी अंडी सोलणे कठीण असते, त्यामुळे थोड्या जुन्या अंड्यांचा वापर करावा.

उकडलेले अंडे कडक पृष्ठभागावर हलके दाबून गोल फिरवावे, जेणेकरून कवच सैल होईल.

नळाच्या वाहत्या पाण्याखाली अंडी सोलल्यास कवच हाताला चिकटत नाही.

अंडी उकडण्यापूर्वी त्यांना सुईने एक लहान छिद्र केल्यासही फायदा होतो.

येथे क्लिक करा...