पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात दही खावे की टाळावे, याबद्दल अनेकदा संभ्रम असतो.
आयुर्वेदानुसार, या ऋतूत दही खाल्ल्याने शरीरातील 'कफ' आणि 'पित्त' वाढू शकते.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे दही पचायला जड जाऊ शकते.
मात्र, दह्यातील 'प्रोबायोटिक्स' पोटाच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी चांगले असतात.
फ्रीजमधील थंड दही खाण्याऐवजी नेहमी ताजे आणि रूम टेम्परेचरवरचे दही खावे.
तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी दही खाणे टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा सांधेदुखीचा त्रास असेल, तर दही मर्यादित प्रमाणातच खा.
स्वतःच्या प्रकृतीनुसार आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या!