Mixer Grinder Cleaning Tips|मिक्सरचे भांडे, पाती स्वच्छ करा ५ मिनिटात, 'या' सोप्या टिप्स वापरा

पुढारी वृत्तसेवा

मिक्सरच्या भांड्यांचे तळ, रबर रिंग, धारदार पाती यांच्या आसपास तेलकटपणा साचतात

मिक्सरच्या भांड्यात १ कप कोमट पाणी, ३-४ थेंब लिक्विड डिशवॉश, अर्धा लिंबाचा रस घाला

मिक्सरचे झाकण लावून भांडे १५-२० सेकंद हाय स्पीडवर फिरवून घ्या

या वाफेमुळे, फेसामुळे पात्यांखाली अडकलेली घाण लगेच सुटी होते

साध्या पाण्याने धुवून घ्या, भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा, व्हिनेगर टाका.

हे मिश्रण पात्यांवर व काळ्या पडलेल्या भागावर लावून १० मिनिटे ठेवा.

जुन्या टूथब्रशच्या मदतीने पात्यांच्या खालची बाजू कडा घासून स्वच्छ करा.

आठवड्यातून मिक्सरच्या सुक्या भांड्यात ३ चमचे मोठे खडे मीठ टाका.

१ ते २ मिनिटे मिक्सर बंद-चालू करत फिरवा.

पात्यांना लागलेला तेलकटपणा निघून जातो, पात्यांची धार छान तीक्ष्ण होते.

Contact Lenses|कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? ‘या’ ५ चुका टाळा, डोळ्यांना होऊ शकतो गंभीर त्रास