Contact Lenses|कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? ‘या’ ५ चुका टाळा, डोळ्यांना होऊ शकतो गंभीर त्रास

पुढारी वृत्तसेवा

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? पण तुमच्या या चुका डोळ्यांना महागात पडू शकतात

लेन्स लावून झोपू नका! डोळ्यांचे ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन गंभीर नुकसान होते

हात न धुता लेन्स डोळ्यात घालू नका, जिवाणूंचा संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात.

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना डोळ्यात/पापण्यांवर चुकूनही रासायनिक काजळ वापरू नका

पोहताना/आंघोळ करताना लेन्स काढायला विसरू नका

साध्या पाण्यातील बॅक्टेरिया डोळ्यांसाठी घातक ठरू शकतात.

लेन्स ठेवायची डबी (Case) रोज स्वच्छ करा, नाहीतर संसर्गाचा धोका वाढतो.

मुदत संपलेली (Expired) लेन्स, सोल्युशन वापरल्याने डोळ्यांची जळजळ वाढू शकते.

डोळ्यांत सतत खाज किंवा अंधुक दिसत असल्यास तात्काळ लेन्स वापरणे बंद करा

अशावेळी नेत्रतज्ज्ञांना (Eye Specialist) लगेच भेट द्या.

लेन्स वापरणाऱ्यांनी 'ही' महत्त्वाची नियमावली नक्की पाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Self-Love Tips|फक्त स्वतःला 'थँक्यू' म्हणा! आयुष्यात कोणते मोठे बदल होतात ते तुम्हीच पाहा