पुढारी वृत्तसेवा
बेकिंग सोडा पेस्ट बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट दिव्यांवर लावून १५-२० मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा.
टूथपेस्टची कमाल जेल नसलेली पांढरी टूथपेस्ट घ्या. ती दिव्यांवर लावून १०-१५ मिनिटे राहू द्या. जुन्या टूथब्रशने हलके घासून पाण्याने स्वच्छ करा.
लिंबू आणि मीठाचा उपाय मीठामध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ती दिव्यांच्या काळ्या भागावर लावा आणि १०-१५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
व्हिनेगरचा वापर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळा. चांदीचे दिवे १०-१५ मिनिटे या द्रावणात बुडवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा.
डिश सोप आणि कोमट पाणी सौम्य डिश वॉश लिक्विड (साबण) कोमट पाण्यात मिसळा. मऊ कापड या पाण्यात भिजवून हलक्या हाताने दिवे साफ करा आणि नंतर कोरड्या कापडाने पुसा.
ॲल्युमिनियम फॉईल आणि सोडा एका भांड्यात ॲल्युमिनियम फॉईल पसरा. त्यात पाणी, बेकिंग सोडा (किंवा वॉशिंग सोडा) आणि मीठ घाला. दिवे त्यात बुडवून उकळा किंवा १५-२० मिनिटे गरम पाण्यात ठेवा, नंतर स्वच्छ करा.
कोरडे करणे महत्त्वाचे कोणत्याही उपायानंतर चांदीचे दिवे लगेच स्वच्छ आणि मऊ कापडाने पूर्णपणे कोरडे करा. ओलावा राहिल्यास पुन्हा डाग पडू शकतात.
पितांबरी (Silver Cleaner) बाजारात मिळणारे चांदी साफ करण्याचे खास पावडर किंवा लिक्विड (उदा. पितांबरी) वापरा. उत्पादनाच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.
टोमॅटो सॉस थोडा टोमॅटो सॉस चांदीच्या दिव्यांवर लावून २० मिनिटे ठेवा. नंतर ब्रशने घासून गरम पाण्याने धुवा. टोमॅटोमधील आम्ल (ऍसिड) काळेपणा कमी करते.