पुढारी वृत्तसेवा
2025 या वर्षामध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.
त्याने आतापर्यंत 12 टी-20आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांसह एकूण 593 धावा कुटल्या केल्या आहेत.
तिलक वर्मा भारताकडून 2025 मध्ये सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या वर्षात त्याने 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह एकूण 346 धावा जमा केल्या आहेत.
संजू सॅमसनने 2025 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 12 सामने खेळले असून, त्यात त्याने 183 धावा केल्या आहेत.
भारताकडून या वर्षात टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे.
हार्दिक पंड्या खालच्या क्रमावर उतरून स्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
त्याने 2025 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 11 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह एकूण 160 धावा केल्या आहेत.
या दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५३ धावांची राहिली आहे.
शिवम दुबेनेही 2025 मध्ये भारतीय संघासाठी चेंडू आणि बॅट दोन्हीद्वारे चांगली कामगिरी केली आहे.
त्याने 2025 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 8 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह एकूण 133 धावा केल्या आहेत.