पुढारी वृत्तसेवा
सफरचंद प्रत्येकालाच आवडणारे फळ आहे. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. मात्र, सफरचंद खाण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे
सफरचंदच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होऊ शकते, मात्र, त्याचा जास्त फायदा मिळविण्यासाठी ते नेमके कसे खावे, हे माहिती आहे का?
तज्ज्ञ सुधीर आष्ट यांच्या मते, सफरचंद नेहमी साल काढून खावे
सफरचंदाच्या सालीमध्ये पोषक घटक असतात, असा दावा करणाऱ्यांनी मग आंबा किंवा केळीही सालीसह का खाऊ नयेत, असा सवाल त्यांनी केला
सफरचंद सालीसह खावे की साल काढून, याबाबत तज्ज्ञांची मते वेगवेगळी असू शकतात. सफरचंदाची साल पौष्टिक घटकांनी समृद्ध असल्याचेही अनेक आहारतज्ज्ञ मानतात
फळाची साल ही निसर्गाने त्याच्या आतील गर आणि बियांना बाहेरील हानिकारक घटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केलेली संरक्षणात्मक पुटी आहे
सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि विविध अँटिऑक्सिडंट्स आढळतात
दररोज सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होऊ शकते
काही फळे सालीसह खावीत, असे काहीजण सांगतात, तर काही फळांची साल काढून खाणे पसंत करतात. बहुतेक लोक सफरचंद साल न काढता खातात