Easter Island Mystery | या रहस्यमय मूर्ती खरचं एलियन्सनी तयार केल्या आहेत?

Namdev Gharal

आपल्या जगात अनेक रहस्य दडलेली आहेत. असेच पॅसिफीक महासागरात अगदी दूर अंतरावर एक बेट आहे Easter Island हे ज्वालामुखी बेट आहे, चिली देशाच्या हद्दीत.

हे बेट निर्जन असे आहे. थोडे स्थानिक लोक Rapa Nui तेथे राहतात पण प्रशांत महासागरात इतर भूभापासून 3500 किमी इतके दूर हे बेट आहे.

या बेटावरचे रहस्य म्हणजे येथे आढळणाऱ्या मोई Moai या मूर्ती. या मूर्ती एलियनने बनवल्या असल्याचा दावा केला जातो. पण पुरावा नाही.

या मूर्ती आकाराने मोठ्या वजन ८ ते १० टन आहेत त्‍यामुळे दगड कोरण्यासाठी लोखंडी साधने नव्हती त्‍यामुळे हा विचार पुढे आला.

मोठ्या मूर्ती खाणीतून लांब गावात कशा आल्या हे लोकांना समजत नव्हते त्‍यामुळे हे परग्रहवासियांचेच काम असावे असे रहस्य तयार झाले.

पण या मूर्ती बेटावरील लोक म्हणजे रापा नुई संस्कृतील लोकांनी (१२०० ते १५०० इसवी सन) काळात कोरल्या असाव्यात असा वैज्ञानिकांचा दावा आहे

या मुर्ती शरीर असलेल्या आहेत. यांचा जवळजवळ 40% भाग जमिनीत गाडलेला दिसतो, पण जमिनीखालचा मोठा भाग म्हणजे धड आणि हात आहेत.

या मूर्तींबाबत अजून एक मिथ्य म्हणजे या खाणींपासून चालत गावापर्यंत आल्या. पण पण नवीन संशोधनानुसार मूर्ती हलवण्यासाठी दोऱ्यांचा वापर केला जात होता.

Moai हे देव किंवा राक्षस होते असे मानले जाते पण Moai म्हणजे पूर्वजांचे स्मारक (ancestor statues) आहे असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे.

बहुतेक Moai बेटाच्या आतल्या दिशेने बघतात. याची उंची: 10–33 फूट व वजन 10-80 टन आहे

या बेटावर अंदाजे अंदाजे 887 Moai मूर्ती आहेत. सर्वात मोठी Moai – “El Gigante” (उंची 69 फूट) अर्धवट तयार स्वरूपात आहे.

Bear Species: जगात आढळतात अस्वलांचे 8 प्रमुख प्रकार