coldest place on earth | पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते?

पुढारी वृत्तसेवा

जगातील अनेक देशांमध्ये इतकी भयानक थंडी असते की, तिथे बर्फाचे जाड थर साचतात आणि सर्व काही गोठून जाते.

भारताचा विचार केला तर सध्या उत्तर भारतात खूप थंडी आहे. पण भारतात सर्वात कमी तापमान सियाचीन मध्ये असते, तिथे पारा -५७ अंश सेल्सिअस पर्यंत खाली जातो.

जगात एक अशी जागा आहे, जिथे यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त थंडी असते. जाणून घेऊया पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाच्‍या ठिकाणाबद्‍दल...

पृथ्वीवर आतापर्यंत अधिकृतपणे नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान -८९.२ अंश सेल्सिअस इतके आहे.

ही नोंद २१ जुलै १९८३ रोजी अंटार्क्टिका मधील 'व्होस्टोक स्टेशन' येथे करण्यात आली होती.

जागतिक हवामान संघटनेने (WMO) या विक्रमाला मान्यता दिली आहे. हे व्होस्टोक स्टेशन अंटार्क्टिकाच्या अतिशय दुर्गम भागात आणि समुद्रापासून खूप दूर आहे.

दरम्यान, नासा (NASA) आणि उपग्रहांच्या (Satellite) मदतीने मिळालेल्या माहितीनुसार, अंटार्क्टिकामध्ये यापेक्षाही अधिक थंड ठिकाणे असू शकतात.

उपग्रहाच्या नोंदीनुसार अंटार्क्टिकातील काही ठिकाणी तापमान -९४ अंश सेल्सिअस पर्यंत, तर जमिनीचे तापमान -९८ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्याचे दिसते. पण हे आकडे जमिनीवरील यंत्रांनी मोजलेले नसल्यामुळे, त्यांना अजून अधिकृत मानले जात नाही.

येथे क्‍लिक करा.