Healthy Eating Tips | नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकीनेही खाऊ नका 'या' गोष्टी; पोटाचं वाजेल बँड!

पुढारी वृत्तसेवा

तुम्ही मांसाहारी असाल तर फक्त 'काय खावू' नये हे माहीत असणे आवश्‍यक आहे.

काही अन्नपदार्थ एकत्र किंवा अगदी कमी वेळेच्या अंतराने खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.

food | Pudhari

विशेषतः मांसाहारी जेवणानंतर काही गोष्टी खाल्ल्याने पचनक्रिया मंदावू शकते.

यामुळे पोट जड होणे, गॅस होणे, आंबट ढेकर येणे किंवा थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात.

तुम्ही वारंवार मांसाहारी जेवण करत असाल कोणत्या गोष्टींपासून थोडे दूर राहिले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मांसाहारी जेवणानंतर लगेचच दूध, दही, पनीर किंवा दुधापासून बनवलेले इतर पदार्थ खाणे टाळावे. अन्‍यथा पोट जड होणे, गॅस होणे किंवा अस्वस्थ वाटू शकते.

चिकन खाल्ले असेल, तर त्यासोबत किंवा लगेचच मासे खाणे टाळावे. दोन्‍हीत प्रोटीन (प्रथिने) असते. त्यांचे पचनासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते.

मांसाहारी जेवणानंतर लगेच टरबूज, संत्रा, किंवा इतर आंबट फळे टाळण्‍याचा सल्ला दिला जातो. जेवणानंतर किमान १ ते २ तासांनी फळे खाणे चांगले.

बऱ्याच लोकांना मांसाहारी जेवणानंतर काहीतरी थंड पिण्याची सवय असते, परंतु ही सवय पचनक्रिया मंदावू शकते.

clold drinks

खूप थंड पेये अन्न लवकर पचू देत नाहीत, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि पोट जड होणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

याशिवाय कोणत्याही विशेष माहितीसाठी किंवा त्रासासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला नक्की घ्या.

येथे क्‍लिक करा.