पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करण्यासाठी गुणकारी
दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य जपतो
यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते.
पचनसंस्था सुधारते
भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनक्रिया सुलभ होते.
शरीराला थंडावा मिळतो
उन्हाळ्यात किंवा शरीरातील उष्णता वाढल्यास दुधी भोपळ्याचा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.
मधुमेहींसाठी उत्तम
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी दुधी भोपळ्याचे सेवन नक्की करावे.
त्वचेसाठी वरदान
दुधी भोपळ्याच्या रसामुळे शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसते.
ताणतणाव होतो कमी
यामध्ये असलेल्या कोलीनमुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते.
कोणासाठी आहे आरोग्यदायी?
धावपळीचे आयुष्य जगणारे, वजन कमी करू इच्छिणारे आणि पचनाच्या तक्रारी असलेल्या प्रत्येकासाठी दुधी भोपळा 'सुपरफूड' आहे.