पुढारी वृत्तसेवा
आले उन्हात वाळवून सुंठ तयार केली जाते. सुंठेमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदात तिला 'विश्वभैषज' आणि 'महौषध' म्हटले जाते.
सुंठ पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रोज सुंठेचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि अन्नाचे पचन नीट होते.
जर तुम्हाला वारंवार अपचन, पोट फुगणे किंवा करपट ढेकर येण्याचा त्रास असेल, तर सुंठ तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध आहे.
आयुर्वेदानुसार, जुनी सर्दी आणि खोकल्याच्या त्रासात दालचिनी आणि खडीसाखरेचा काढा प्यायल्याने आराम मिळतो.
शरीरातील कफप्रकोप आणि वायू (गॅस) चे विकार दूर करण्यासाठी सुंठेचे चूर्ण दुधासोबत घेणे खूप फायदेशीर ठरते.
वाढत्या वयात हातापायांचे सांधे दुखणे किंवा आमवाताचा त्रास असल्यास सुंठ शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करते.
सुंठ, आवळा आणि खडीसाखरेचे चूर्ण घेतल्याने हायपर अॅसिडिटी (अम्लपित्त) कमी होते.
नियमित सुंठेचा काढा करून प्यायल्याने शरीर सुदृढ बनते आणि मन प्रसन्न राहते.
मूळव्याधीचा (Piles) त्रास असणार्यांना सुंठेचे चूर्ण ताकात घालून प्यायल्याने अत्यंत आराम मिळतो.
टीप! सुंठ जरी अत्यंत गुणकारी असली, तरी ती उष्ण प्रकृतीची असते. त्यामुळे 'पित्तप्रकृती' असणाऱ्यांनी सुंठेचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.