पुढारी वृत्तसेवा
वारंवार गोड खाण्यामुळे वजन वाढू शकते. पण, योग्य आहाराने यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे!
अंडी, दही आणि पनीर यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अचानक गोड खाण्याची इच्छा होत नाही.
बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया यातून निरोगी फॅट्स आणि प्रोटीन मिळतात, जे क्रेव्हिंग नियंत्रित ठेवतात.
ओट्स हळूहळू पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा होत नाही.
खूपच गोड खावंसं वाटलं, तर डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा खा. यात नेहमीच्या चॉकलेटपेक्षा खूप कमी साखर असते.
बीन्स, मसूर आणि हरभरे (चणे) यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन असते. हे पदार्थ अनहेल्दी स्नॅक्स खाण्यापासून वाचवतात.
गाजर, काकडी आणि रताळे यांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे भूक कमी लागते आणि शुगर क्रेव्हिंग थांबते.
ग्रीक योगर्ट प्रोटीनने समृद्ध असते. नैसर्गिक गोडव्यासाठी तुम्ही यामध्ये तुमची आवडती फळे मिक्स करून खाऊ शकता.
जेव्हा जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल, तेव्हा बाजारातील पाकिटातील पदार्थांऐवजी घरच्या घरी हे पर्याय निवडा.