पुढारी वृत्तसेवा
शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन C भरपूर असल्याने हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सांधे दुखणे आणि सूज कमी होते.
शेवग्याची शेंग फायबरयुक्त असल्याने बद्धकोष्ठता कमी होते.
कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे हाडांची ताकद वाढते, विशेषतः थंडीत.
शेवग्याची शेंग रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करून हृदय निरोगी ठेवते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन वाढण्यापासून बचाव होतो.
हिवाळ्यात शरीराला आतून उब देण्यास शेवग्याची शेंग उपयुक्त ठरते.