पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील दाट धुके वाहनचालकांसाठी मोठे आव्हान ठरते.
कमी दृश्यमानते (Visibility)मुळे अपघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुढील टिप्स उपयुक्त ठरतील.
धुक्यामध्ये रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहनाचा वेग तातडीने कमी करा. घाई करण्यापेक्षा सावधगिरीने गाडी चालवा.
रस्ता स्पष्ट दिसावा आणि इतर वाहनचालकांना तुमची गाडी दिसावी यासाठी 'फॉग लाइट्स' किंवा 'लो-बीम' हेडलाईट्सचा वापर करा. 'हाय-बीम' वापरणे टाळा.
गाडीच्या काचा स्वच्छ ठेवा. धुक्यामुळे काचेवर साचणारी वाफ घालवण्यासाठी वायपर्स आणि 'डिफ्रॉस्टर'चा वापर करा, जेणेकरून समोरचे दृश्य स्पष्ट दिसेल.
कमी दृश्यमानतेमध्ये रस्ते भरकटण्याची शक्यता असते. अशा वेळी रस्त्यावरील पांढऱ्या किंवा पिवळ्या पट्ट्यांचा आधार घ्या आणि आपल्याच लेनमध्ये गाडी चालवा.
पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा. अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास, पुरेशी जागा असल्यास तुम्ही अपघात टाळू शकता.
धुक्यामध्ये समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने ओव्हरटेक करु नका.
धुके अतिशय दाट असेल आणि रस्ता दिसत नसेल, तर धोका पत्करण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी (उदा. पार्किंग किंवा रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतर सोडून) गाडी उभी करा. धुके कमी होण्याची प्रतीक्षा करा.