Anirudha Sankpal
नियमित साखरेऐवजी झिरो-शुगर पेये प्यायल्यास कॅलरीज कमी होतात, मात्र पाण्याऐवजी दिवसभर ती पिणे टाळावे.
त्यातील कृत्रिम स्वीटनर्स आणि माल्टिटॉल किंवा माल्टोडेक्स्ट्रिनसारखे घटक जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अस्पार्टम, सुक्रालोज आणि अॅसेसल्फेम पोटॅशियम ठरलेल्या दैनंदिन मर्यादेत सुरक्षित मानले जातात, परंतु एकूण दैनंदिन सेवन लक्षात घेणे गरजेचे आहे.
किडनीचा त्रास किंवा रक्तातील पोटॅशियम जास्त असल्यास अॅसेसल्फेम-के टाळावे आणि गरोदरपणात व लहान मुलांसाठी सुक्रालोजबाबत काळजी घ्यावी.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी झिरो-शुगर पेये प्रवास किंवा व्यस्त जीवनशैलीत अल्पकाळासाठी उपयुक्त ठरू शकतात, परंतु दीर्घकाळ केवळ त्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही.
तरुण पिढीत मधुमेहाची जागरूकता, ऊर्जेची पातळी, त्वचा आणि झोपेबाबतची काळजी यामुळे कमी साखरेची आणि कमी गोड चवीची पेये निवडण्याचा कल वाढत आहे.
केवळ पॅकेटच्या पुढील दाव्यांवर विश्वास न ठेवता 'झिरो शुगर', 'नो अॅडेड शुगर' आणि 'लो कॅलरी' यातील फरक समजून घेऊन घटकांची यादी नीट वाचणे महत्त्वाचे आहे.
लेबलवर कृत्रिम स्वीटनर्सची घोषणा, सुक्रालोज-अॅस्पार्टमसारखी नावे तसेच INS ९५०, ९५१ किंवा ९५५ सारखे क्रमांक तपासावेत आणि सॉर्बिटॉल, माल्टिटॉल किंवा फळांच्या रसाचा अर्क दडलेला नाही ना याची खात्री करावी.
प्रति १०० मिलीऐवजी संपूर्ण कॅन किंवा बाटलीतील साखर, कॅलरीज, सोडियम, कॅफिन, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अॅसिड्सचे प्रमाण पाहूनच दैनंदिन सवयीचा निर्णय घ्यावा.