पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेकदा सांगितले जाते. यावर आता संशोधनातून शिक्कामोर्तब झाले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या प्रयोगात ३६,००० अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते.
फेसबुक आणि इंस्टाग्राम सोडल्यामुळे लोकांच्या भावनिक आरोग्यात मोठी सुधारणा झाल्याचे समोर आले आहे.
विशेषतः इंस्टाग्रामपासून दूर राहण्याचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम तरुण महिलांवर दिसून आला आहे.
संशोधनात सहभागी झालेल्यांमध्ये १९,८५७ फेसबुक आणि १५,५८५ इंस्टाग्राम वापरकर्त्यांचा समावेश होता.
फेसबुक अकाऊंट 6 आठवड्यांसाठी बंद ठेवणाऱ्यांच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली.
इंस्टाग्राम डिटॉक्सचा सर्वाधिक फायदा १८ ते २४ वयोगटातील तरुणींना झाला.
संशोधनात असेही स्पष्ट झाले की, लोकांचा मूड सुधारण्याचे कारण कमी झालेला 'स्क्रीन टाइम' नसून, विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडणे होते.
यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या अभ्यासातही विशिष्ट ॲप बंद ठेवल्याने लोकांच्या आनंदात वाढ झाल्याचे दिसून आले होते.