पुढारी वृत्तसेवा
पचनक्रियेवर परिणाम होतो
जेवणानंतर लगेच पाणी पिल्यास पचनासाठी आवश्यक असलेले पाचक रस पातळ होतात. यामुळे अन्न नीट पचत नाही.
अॅसिडिटी आणि गॅस वाढतो
जेवणानंतर पाणी पिण्यामुळे पोटात आम्लनिर्मिती बिघडते, ज्यामुळे अॅसिडिटी, ढेकर आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
पोट फुगल्यासारखं वाटतं
अन्नासोबत किंवा लगेच पाणी घेतल्यास पोटात अतिरिक्त दाब निर्माण होतो आणि पोट फुगल्यासारखं वाटतं.
पोषकतत्त्वांचे शोषण कमी होतं
पाणी लगेच पिल्यामुळे अन्नातील पोषकतत्त्व शरीरात योग्य प्रमाणात शोषली जात नाहीत, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
वजन वाढीचा धोका
पचन नीट न झाल्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो. यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.
मधुमेह रुग्णांसाठी धोका
जेवणानंतर पाणी पिल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक बदलू शकते, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
थकवा आणि आळस जाणवतो
पचनक्रिया मंदावल्यामुळे शरीरात ऊर्जा कमी तयार होते आणि जेवणानंतर थकवा येतो.
तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर किमान 30 ते 45 मिनिटांनी पाणी पिणं अधिक योग्य मानलं जातं.
योग्य सवय आरोग्यदायी
जेवणापूर्वी थोडं पाणी पिणं चालू शकतं, पण जेवणानंतर लगेच पाणी टाळल्यास पचन सुधारतं आणि शरीर निरोगी राहतं.