Anirudha Sankpal
आयुर्वेदानुसार जेवल्यानंतर लगेच काही गोष्टी करणं टाळणं आरोग्यासाठी हितकारक असतं.
लगेच झोपू नका
पचनक्रिया मंदावून ॲसिडिटी व गॅस होतो; जेवणानंतर १५-२० मिनिटे शांत बसा किंवा हळू चाला.
कठीण व्यायाम नको
जेवणानंतर लगेच व्यायाम केल्याने पचन प्रक्रियेत अडथळा येतो; त्याऐवजी १० ते १५ मिनिटे हलके शतपावली (चालणे) करा.
धूम्रपान पूर्णपणे टाळा
जेवणानंतर सिगारेट पिल्याने आम्लपित्त, अजिर्ण आणि छातीत जळजळ यांसारखे गंभीर त्रास होतात.
लगेच गोड खाऊ नका
जेवल्यानंतर लगेच गोड खाल्याने रक्तातील साखर अचानक वाढते व लठ्ठपणा येतो; गोड खाायचे असल्यास १-२ तासांनीच घ्या.
नैसर्गिक पर्याय निवडा
जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असल्यास फळे, खजूर किंवा सुका मेवा यांसारख्या आरोग्यदायी घटकांची निवड करा.
पचनास वेळ द्या
जेवणानंतर लगेच काहीही न करता शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे.
चहा-कॉफी टाळा
जेवल्यानंतर लगेच चहा, कॉफी अॅसिडिटी वाढू शकते, पचनक्रिया मंदावते. अन्नातील पोषक घटकांचे शोषण कमी होते; चहा किंवा कॉफी नेहमी १ ते २ तासांनीच घ्या.
योग्य सवय लावा
स्वच्छ श्वास आणि निरोगी पचनक्रियेसाठी जेवणानंतर १०-१५ मिनिटे चालणे ही सर्वात उत्तम सवय आहे.