पुढारी वृत्तसेवा
दुधी भोपळा ही बारमाही भाजी असून आरोग्याच्या दृष्टीने तिला ‘संजीवनीदूत’ मानले जाते.
वाफवलेल्या दुधीत धने, जिरे, हळद व कोथिंबीर घालून खाल्ल्यास हृदयविकाराच्या रुग्णांना चांगली ताकद मिळते.
तीव्र ताप चढल्यास किंवा कडक उन्ह लागल्यास दुधी किसून कपाळावर बांधल्याने शरीरातील उष्णता शोषून घेतली जाते.
दुधीमुळे गरोदर स्त्रियांना आवश्यक पोषक घटक मिळतात आणि गर्भावस्थेतील मलबद्धतेचा त्रास दूर होतो.
दुधीच्या रसात मध किंवा साखर घालून प्यायल्यास घशातील आग, शरीराचा दाह आणि रक्तविकार दूर होतात.
महर्षी सुश्रुतांच्या मते...दुधी भोपळा अत्यंत थंड, रुक्ष आणि जुलाबावर गुणकारी आहे; तो पित्त-कफ दूर करून शरीराला थंडावा देतो.
युनानी शास्त्रानुसार, दुधीचे बी मस्तकातील उष्णता दूर करून मेंदूला शक्ती आणि ताजेतवानेपणा पुरवण्यासाठी वापरले जाते.
चण्याच्या डाळीतील दुधीची भाजी आणि दुधीचा हलवा अत्यंत स्वादिष्ट, गुणकारी व शरीराला शीतलता देणारा असतो.
दुधीचे लांब, तुंबडी आणि चपटे प्रकार असतात. इंग्रजीत याला आकारामुळे ‘Bottle Gourd’ म्हणतात.
दुधीच्या वाळलेल्या कवचाचा वापर पाणी भरण्याचा कुंजा, घरगुती भांडी आणि संगीताची वाद्ये बनवण्यासाठीही केला जातो.
(टीप: कडू दुधी भोपळा हा विषारी असतो, त्यामुळे भाजी किंवा रसासाठी नेहमी गोड आणि कोवळा दुधीच वापरावा.)