पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात ताक म्हणजे शरीरासाठी अमृत आहे पण त्याचं प्रमाण महत्त्वाचं.
ताक शरीराला हायड्रेटेड ठेवतं, उष्णता कमी करतं आणि पचन सुधारायला मदत करतं. म्हणूनच अनेक जण रोज ताक पितात.
ताकातील नैसर्गिक प्रोबायोटिक्समुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक उत्तम नैसर्गिक पेय आहे. घामामुळे गेलेलं पाणीही भरून निघतं.
ताकामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि दातांचं आरोग्य टिकून राहतं.
ताकात कॅलरीज कमी असतात. पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त जेवन जात नाही.
जीवनसत्त्वांमुळे त्वचा चमकदार राहते आणि शरीराची इम्युनिटीही वाढते.
दररोज १ लिटर किंवा त्याहून जास्त ताक घेतल्यास काही लोकांना ॲसिडिटी, गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.
ज्यांना दूध पचत नाही (लॅक्टोज इनटोलरन्स) त्यांना ताकामुळे जुलाब, पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
ताक नेहमी ताजं, थोडं मीठ आणि जिरं घालून प्या. प्रमाणात घेतलं तर ताक आरोग्यासाठी वरदान ठरतं जास्त पिलं तर ते त्रासदायक ठरु शकत.