पुढारी वृत्तसेवा
लवंग पाणी यूजिनॉल या जैवरासायनिक घटकाने समृद्ध असून दाहकविरोधी, जीवाणूनाशक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात
लवंग पाणी फुफ्फुसातील बलगम आणि दाह कमी करण्यास मदत करू शकते, ज्यांना श्वसनाशी संबंधित त्रास किंवा जडत्व वारंवार जाणवते त्यांच्यासाठी गुणकरी ठरते
यूजिनॉलमुळे फुफ्फुस स्वच्छ होतात त्याचबरोबर दाहग्रस्त श्वसननलिका शिथिल होण्यास मदत होते
लवंग पचनास मदत करणारे एंझाईम सक्रिय करतात, ज्यामुळे शरीर अन्न अधिक प्रभावीपणे पचवू शकते
अनियमित आहार आणि फास्टफूडमुळे पोट फुगण्याचा त्रास होत असल्यास लवंग पाणी घेतल्यास आराम मिळण्यास मदत होते
लवंग पाणी प्यायल्यास शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊन त्वचा उजळ आणि अधिक चमकदार दिसू लागते
लवंगेतील अँटिऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्सला तटस्थ करतात, त्यामुळे वृद्धत्व आणि त्वचेची हानी होण्यापासून रोखते
लवंगातील जीवाणूनाशक गुणधर्म तोंडाच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त आहे, लवंग पारंपरिकपणे दातदुखीवर उपचार म्हणून वापरले जाते
लवंग पाणी नैसर्गिकरित्या मेलाटोनिनची पातळी वाढवू शकते, ज्यामुळे मज्जासंस्था शिथिल होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते