पुढारी वृत्तसेवा
ड्रॅगन फ्रूट का खास?
ड्रॅगन फ्रूट हे पाण्याने आणि पोषक तत्त्वांनी भरलेले सुपरफूड मानले जाते.
शरीर हायड्रेट ठेवते
उन्हाळ्यात हे फळ शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
इम्युनिटी वाढवते
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पचन सुधारते
यातील फायबर पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठता कमी करते.
त्वचेला नैसर्गिक ग्लो
ड्रॅगन फ्रूट त्वचेला तजेलदार आणि हेल्दी ठेवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत
कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
हृदयासाठी फायदेशीर
हे फळ कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.
डायबिटीजसाठीही उपयोगी
मर्यादित प्रमाणात घेतल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
कसा खावा?
ताजे कापून किंवा सलाडमध्ये मिसळून खाल्ल्यास जास्त फायदे मिळतात.