पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त कायदेच नाही तर विचारांचीही क्रांती घडवली. त्यांच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद होती.
त्या काळात वंचित समाजाचा आवाज कुठेच ऐकू येत नव्हता. बाबासाहेबांनी पत्रकारितेला शस्त्र बनवलं.
१९२० साली सुरू झालेलं ‘मूकनायक’ हे त्यांचं पहिलं पाक्षिक. ज्यांचा आवाज दाबला गेला होता, त्यांचं व्यासपीठ बनलं.
बहिष्कृत समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं. हा फक्त पेपर नव्हता, तर आंदोलन होतं.
‘समता’मधून त्यांनी समतावादी समाजाची संकल्पना मांडली. सामाजिक सुधारणांचा जोरदार प्रचार केला.
'जनता’ हे वृत्तपत्र अनेक वर्षे चाललं. आंबेडकर चळवळीचा इतिहास इथे जिवंत राहिला.
४ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू झालेलं हे त्यांचं शेवटचं वृत्तपत्र. प्रबुद्ध समाजाच्या दिशेने वाटचाल दाखवणारा दीप.
ही सर्व वृत्तपत्रे प्रामुख्याने मराठीतून प्रकाशित होत होती. मराठी भाषा ही समाज परिवर्तनाचं माध्यम बनली.
बाबासाहेबांसाठी पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या नव्हत्या. ती होती सामाजिक न्यायासाठीची लढाई.