mental Health and dopamine |आनंदी राहायचंय? 'डोपामाइन' वाढवण्यासाठी करा हे ७ सोपे उपाय!

पुढारी वृत्तसेवा

डोपामाइन हे एक 'फिल-गुड' (आनंद देणारे) न्यूरोट्रांसमीटर आहे. हे शरीराच्या अनेक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

नियमित शारीरिक हालचाल (वेगाने चालणे, जॉगिंग) हा डोपामाइन वाढविण्‍याचा खात्रीशीर मार्ग आहे.

आतड्यांचे आरोग्य डोपामाइनच्या पातळीशी जोडलेले असते. आहारात फायबरयुक्त (तंतुमय) आहाराचा समावेश करा.

योग किंवा ध्यानाचा सराव करा. ध्यान, सजगता (mindfulness) किंवा संथ, दीर्घ श्वास घेण्याचे छोटे सत्र डोपामाइनच्या निर्मितीला चालना देतात.

निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यामुळे शरीरात डोपामाइन उत्सर्जित होण्यास मदत होते.

एखादे काम पूर्ण केल्यावर बक्षीस म्हणून डोपामाइन उत्सर्जित होते. मोठे व लहान काम सोप्या टप्प्यांत विभागून पूर्ण करा. 'टू-डू' लिस्टवर तशी खूण करा.

काही मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे हा डोपामाइनची पातळी वाढवण्याचा, मूड सुधारण्याचा आणि प्रभावी मार्ग आहे.

झोपेच्या कमतरतेमुळे डोपामाइनच्या संकेतांमध्ये अडथळा येतो. दररोज रात्री ७-९ तासांची शांत झोप घेण्याचे लक्ष्य ठेवा आणि झोपण्याची एक ठराविक वेळ पाळा.

येथे क्‍लिक करा.