Doomsday Vault|भविष्‍यातील मानवजातीसाठी येथे जमा केले आहेत जगभरातील धान्यांचे बीज

Namdev Gharal

जर समजा अणुयुद्धाने जगच नष्‍ट झाले तर भविष्‍यात मानव जात उत्‍क्रांत झाली तर त्‍याच्या उपजिवीकेसाठी एक बिजभांडार तयार केले आहे.

स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट असे याचे नाव असून स्पिट्सबर्गन बेट, नॉर्वे या देशात हे बिजभंडार आहे

स्वालबार्ड बीज बँक ही जगातील सर्वात मोठी आणि सुरक्षित बीज साठवणूक केंद्र आहे. हिला "डूम्सडे व्हॉल्ट" (Doomsday Vault) असेही म्हटले जाते.

स्वालबार्ड बेट आर्क्टिक वर्तुळाजवळ असून, हे उत्तर ध्रुवाजवळील अतिशय थंड हवामान असलेले ठिकाण आहे.ही नैसर्गिक थंडी बीजांचे दीर्घकाळ सुरक्षित साठवण करण्यास योग्‍य आहे

नॉर्वे सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे या ‘सीड वाल्‍ट’चे सरंक्षण व निंयत्रण केले जाते. जैवविविधतेचे संरक्षण आणि अन्नसुरक्षा हा याचा मुख्य उद्देश आहे

याठिकाणी जगातील प्रत्‍येक देशातील धान्य, फळे यांची बियाणे जमिनीखाली मायनस - १८ अंश सेल्‍सिअस इतक्‍या कमी तापमानात संरक्षित करून ठेवले आहे.

जगभरातील शेतीसंस्‍कृती अन्नधान्य आणि वनस्पतींची जैवविविधता जपणे, भविष्‍यात ही नष्‍ट झाली तर हे या बिज भंडारामुळे ती पुर्नजिवीत करता येईल.

समजा अणुयुद्ध किंवा महामारी, आपत्ती अशा संकटाने जर मूळ बीज नष्ट झाले, तर त्याचा एक भाग भविष्‍यासाठी उपलब्ध असने गरजेजे आहे यातूनच याची निर्मिती झाली आहे.

बीज बँकेमध्ये 100 पेक्षा अधिक देशांमधील 1 दशलक्षहून अधिक बीज नमुने (Seed Samples) सुरक्षित ठेवले गेले आहेत.

ही बॅंक जमिनीखाली 3 खोल खड्ड्यांमध्ये ती विभागात विविध बिजे साठवली असून, याची खोली जमिनीखाली सुमारे 120 मीटर इतकी आहे.

BYD shenzhen