पुढारी वृत्तसेवा
दोडका हा संपूर्ण भारतात आढळतो; पण दक्षिण आणि पूर्व भारतात या भाजीला विशेष पसंती दिली जाते.
गोड दोडक्यावर १० शिरा, तर कडू दोडक्यावर ९ शिरा असतात असे मानले जाते.
कडू आणि गोड दोडके दिसायला सारखेच असल्याने भाजी करण्यापूर्वी दोडका चाखून पाहणे गरजेचे असते.
दोडक्याच्या भाजीत मिऱ्याची पूड आणि लिंबाचा रस घातल्यास भाजी अतिशय स्वादिष्ट बनते आणि वातुळपणाही कमी होतो.
कडू दोडका आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो.
दोडका पित्तनाशक आणि अग्निप्रदीपक आहे. श्वास, ताप, खोकला, कृमी आणि मलबद्धता यांवर दोडका उपयुक्त ठरतो.
दोडक्याच्या वेलाची मुळी गाईच्या दुधात किंवा पाण्यात घासून सलग ३ दिवस सकाळी प्यायल्यास मुतखडा नाहीसा होतो.
दोडका पचायला जड आणि कफ-वायू वाढवणारा असल्याने पावसाळ्यात आजारी व्यक्तींनी ही भाजी खाणे टाळावे.
निरोगी लोकांनी दोडक्यातील वातुळपणा कमी करण्यासाठी भाजीत लसूण आणि तेलाचा योग्य वापर करूनच तिचे सेवन करावे.