Donald Trump Education | भारत आणि पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा करणारे डोनाल्ड ट्रम्प किती शिकलेत माहीत आहे का?

मोहन कारंडे

भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणारे डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत.

ट्रम्प यांचे शिक्षण काय झाले, माहीत आहे का?

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणी होण्यापूर्वी एक यशस्वी उद्योजक होते

न्यूयॉर्क शहरात जन्म

डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यूयॉर्क शहरात झाला. शालेय शिक्षणासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील 'केव-फॉरेस्ट स्कूल' मध्ये प्रवेश घेतला.

शिस्त शिकवणारी वळणवाट

वयाच्या १३व्या वर्षी 'न्यूयॉर्क मिलिटरी अकॅडमी'मध्ये दाखल. सैनिकी शिस्तीत शालेय शिक्षण.

गणितात विशेष गोडी

सैनिकी शाळेत ट्रम्प यांनी नेतृत्व, खेळकौशल्य आणि शिस्तीत प्रावीण्य मिळवलं. शालेय जीवनातच ट्रम्प यांची गणितात विशेष गोडी होती.

ट्रम्प अर्थशास्त्रात पदवीधर आहेत. १९६८ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली.

शिक्षणातून व्यवसायात झेप

शिक्षण संपल्यानंतर त्यांनी वडिलांच्या रिअल इस्टेट व्यवसायात सक्रिय सहभाग घेतला

येथे क्लिक करा