पुढारी वृत्तसेवा
कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अत्यंत विलक्षण असून ती माणसांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते
कुत्र्याच्या नाकामध्ये सुमारे २२ कोटी वास ओळखणारे रिसेप्टर्स असतात. त्यामुळे आजार किंवा ताणतणावामुळे मानवी शरीरात होणारे सूक्ष्म रासायनिक बदल ओळखू शकतात
वास घेण्याच्या अद्भुत क्षमतेमुळे माणसांना जाणीव होण्याआधीच कुत्रे काही वैद्यकीय समस्या ओळखू शकतात
कर्करोगाच्या पेशींमधून शरीरात काही विशिष्ट वायुरूप सेंद्रिय संयुगे स्रवतात, जी माणसांच्या इंद्रियांना जाणवत नाहीत; मात्र कुत्रे ती सहज ओळखू शकतात
नार्कोलेप्सी झटके येणारा मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे. शरीरातून काही सूक्ष्म रासायनिक संकेत स्रवतात, जे प्रशिक्षित कुत्रे ओळखू शकतात
मायग्रेन सुरू होण्याआधी वासामध्ये, चेहऱ्यावरील भावांमध्ये किंवा वर्तनात होणारे सूक्ष्म बदल कुत्र्यांच्या लक्षात येतात
रक्तातील साखर कमी झाल्यावर मानवी श्वासामध्ये आयसोप्रिन (isoprene) सारखे काही रासायनिक घटक निर्माण होतात, ते कुत्रे सहज ओळखू शकतात
निरीक्षणांनुसार झटका येण्याआधी मालकाच्या वासात, वर्तनात किंवा हालचालींमध्ये होणारे सूक्ष्म बदल कुत्र्यांना जाणवतात
मानवी शरीरातून भीती आणि ताणतणावाच्या वेळी अॅड्रेनालिन व कॉर्टिसोलसारखे हार्मोन्स स्रवतात, जे कुत्रे ओळखू शकतात