कुत्रा नेहमी जीभ बाहेर का काढतो?

Namdev Gharal

कुत्र्यासाठी त्‍याची जीभ म्‍हणजे त्‍याच्या साठी ॲन्टीसेफ्टिक असते, कारण कुत्र्याला जेंव्हा जखम होते तेव्हा तो जीभेने तो चाटतो. त्‍याच्या लाळेने जखम भरून येते

हिट स्‍ट्रोक व हार्ट ॲटॅकसारख्या रोगांपासून रक्षण करण्याचे काम त्‍याची जीभच करत असते

जेव्हा माणूस श्वास घेतो तेव्हा मिनीटाला १० ते १२ वेळा श्वाच्छोश्वास घेतो. तर कुत्रा सामान्यपणे २५ ते ३० वेळा श्वास आतबाहेर करतो.

माणूस सामान्यता आपल्‍या नाकाने श्वास घेतो पण कुत्रा हा नाक व तोंडाने श्वास घेतो, यावेळी त्‍याची जीभ आत बाहेर होते

तापमान नियंत्रण करण्यासाठी माणसांमध्ये घाम येतो. पण कुत्र्यांमध्ये घामाच्या ग्रंथी खुपच कमी असातात त्‍यामुळे त्‍याला जीभ बाहेर काढावी लागते

तापमान नियंत्रीत करण्यासाठी कुत्र्याला पॅन्टींग (panting) करावे लागते. म्‍हणजे तोंडाने जीभ बाहेर काढून जोरजारात श्वास घ्‍यावा लागतो.

ज्‍यावेळी कुत्रा पळतो किंवा उष्‍णता जास्‍त असते त्‍यावेळी त्‍याची श्वास घेण्याची गती मिनिटाला १०० पेक्षा जास्‍त होते.

पॅन्टींग (panting)केल्‍यानंतर त्‍यांच्या तोंडातून बाष्‍प व लाळ बाहेर टपकते व त्‍याचे तापमान नियंत्रित राहते

एखाद्या कुत्र्याला खूप पळवले व त्‍याचे जबरदस्‍ती तोंड बंद करुन त्‍याला जीभ बाहेर काढू दिली नाही तर कुत्र्याचा मृत्‍यूसुद्धा होऊ शकतो.

त्‍यामुळे कुत्र्याच्या शारिरीक स्‍वास्‍थ्‍यासाठी जीभ हे सर्वात महत्‍वाचे अंग आहे

प्राण्यांच्या ‘या’ गोष्‍टी ऐकून अचंबित व्हाल